शोधसी मानवा
शोधसी मानवा
1 min
7
*शोधीसी मानवा*
मानवा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
जीवनी विविध कलांचा तूच आहे कलाकार...
तूच आधार आहेस तुझ्या घरच्यांचा
सांभाळ कर उत्तम आपल्याच कुटुंबाचा....
मानवा नको कोणाची मानहानी करू
नको कोणाच्या दुःखाला कारणीभूत ठरू....
शोधसी मानवा तुझ्या जीवनाचा तूच मार्ग
मानवाच्या मनातील भावना समजून घे अर्थ....
तुझ्या जीवनाचा तू स्वतः हो सारथी
उत्तम रथ चालवला तर घरचे करतील आरती...
शोधसी मानवा जनमाणसात आनंदाचा
ठेवा
मग या जीवनात भरपूर मिळेल सुखाचा मेवा..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*
