शर्यत
शर्यत
*ससा हरला कसा*
ससा आणि कासव
यांची एकदा शर्यत लागली
एका मोठया झाडाखाली
दोघे आणि मंडळी जमली....
ससा चालला तुरुतुरु
कासव चालले हळूहळू
ससा आहे खूप भित्रा
कासव आहे कनवाळू...
धावताना ससा मागे पाही
कासव खूपच मागे राही
ससा हसला आणि फसला
गाजर, मुळा खाऊन सुस्त होई...
सशाला आली पेंग आता
कासव काही दूर दिसेना
डुलकी घ्यायला लागला
कासव जवळून गेले तरी उठेना...
एकदाचा ससा उठला
दिली मस्त एक तान
इकडे तिकडे पाहिले
मनी वदला आपलाच मान...
धवायला लागला परत
ससा
इच्छित स्थळी पोहोचला
कासव त्याच्या आधी तिथे
कासवाने विजय मिळवला....
गर्वाचे घर झाले ह खाली
खरं सांगा ससा हरला कसा??
मुलांनो कधीही बढाई नको
शब्द कोणता नको हार होईल असा...
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
