नको रे मना
नको रे मना
1 min
9
*नको रे मना*
नको रे मनी वाईट विचार सारे
सज्जनांची साथ हवी जीवनी रे
दुर्जनांची संगत नकोच कधी रे
उत्तम संस्कारांची साथ सदा असू दे रे...
चांगल्या विचारांच्या संगतीत राहू दे
अनाथांची, वृद्धांची सेवा नित्य घडू दे
देवा दुर्बलांचा साथीदार बनू दे
मनी कोणताच कधीही द्वेष नसू दे.....
भाव मनातील चांगलाच असू दे
जसा भाव तसे योग्य फळ मात्र दे
अपेक्षा काही कोणाकडूनही नसू दे
एकमेकांशी जातीभेद विसरून वागू दे...
वसुधा वैभव नाईक
धनकवडी , जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116
