जीवलगा
जीवलगा
1 min
14
*जीवलगा*
आला पावसाळा आणि गेला पावसाळा
आला रे बाबा आता हा हिवाळा..
वसुंधरा भिजली, पावसात नहाली
सर्व अबालवृद्ध पावसात रमली...
पर्वत,डोंगर,घाट हिरवाईने नटले
नद्या -नाले पण दुथडी वाहू लागले...
निसर्ग सौंदर्याने वसुधापण सजली
वृक्षतोड करून मानवाने माणुसकी सोडली...
चल जीवलगा सारे आपण निपटूया
सर्वांच्या साथीने पर्यावरण संभाळूया...
माणसाचा जन्म मिळाला माणुसकी जपूया
सामाजिक कार्याला सर्व हातभार लावूया....
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
