STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

वय साठीचे

वय साठीचे

1 min
17

वयाची साठी...😃
 आज जरा घरात घातच झाला
 माझा बाथरूम मधे पाय घसरला....
 स्टील स्टूलचा आधार घेतला
 त्यानेच आपला पाय की वाकवला...
 आवाज झाला,धपकन पडले
 डोक्याला दोन ठिकाणी टेंगुळ आले...
 डोके, डोळे थोडेसे गरगरले
 हात, पाय पण थोडे लटपटले...
 जरी जास्त काही लागले नाही
तरी घरातली कुठे लागले पाही...
 आज वयाने दाखवून आता दिले
 तुझे धावायचे दिवस संपून गेले....
 राहिले जीवन जगून घे आनंदाने
 मौज मजा कर मित्रांच्या साथीने...
 कविता कर, लेख लिही छान
 समाजाची सेवा करत मिळव मान...
 आता मस्ती नाही करायची बरं
 बिना तनुची पडझड करत जगायचे खरं....
 वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116


साहित्याला गुण द्या
लॉग इन