आठवणींचा डोंगर
आठवणींचा डोंगर
आठवणींचा डोंगर तसाच मागे ठेवून जगातून निघून जाणे...!
आयुष्य म्हणजे क्षणांची एक सुंदर माळ
कधी सुखाची सावली, कधी दुःखाचा काळ...
जगण्याच्या वाटेवर अगणित माणसं भेटतात
काही मनात राहतात, काही विस्मृतीत जातात...
कुणाच्या ओठांवर हसू बनून राहावे
कुणाच्या डोळ्यांत आठवण बनून तरळावे....
कुणाच्या शब्दांत आपले नाव सदा यावे
तर कुणाच्या मनात आपले अस्तित्व जपले जावे...
आठवणींचा डोंगर उभा करून ठेवावा
प्रेमाच्या पाऊलखुणांनी तो सजवावा....
आपण नसतानाही आपलेपणाचा गंध दरवळावा आनंदी क्षणांनी बहरलेला कुणाचा तरी चेहरा खुलावा...
नको प्रसिद्धीचा हव्यास, नको मोठेपणाचा मान
माणसांच्या मनात असावा फक्त प्रेमरुपी सन्मान...
जाताना सोबत काहीच नेता येत नाही
आपण दिलेल्या मायेची शिदोरी कधी संपत नाही...
जगावं असं की आठवणींना शब्द फुटावेत
आपल्या माणसांचे डोळे प्रेमाने भरून यावेत....
जीवनरूपी प्रवास एक दिवस थांबणारच आहे ना हो!
मग आपल्या जगण्याचा सुगंध मात्र दरवळत ठेवा जन हो!....
देहाची माती झाली तरी विचार जिवंत राहावेत आपल्या कर्माचे दीप इतरांच्या वाटेवर उजळावेत....
आठवणींचा डोंगर इतरांच्या मनात ठेवून जावे
माणुसकीचे दीप मनामनात तेवत ठेवावेत....
आपण वर्तमानकाळाचा आनंद उपभोगवा
भविष्यकाळाचा खूप अट्टाहास नसावा...
आता आलेला क्षण आनंदात जगून घ्यावा
आपण समाजात प्रेरणेचा स्त्रोत व्हावा...
आजकाल प्रदूषण खूपच वाढले
माणसातले माणूस पण संपत चालले....
काही दुखतय म्हणून माणूस हॉस्पिटलला जातो
आणि चार माणसांच्या खांद्यावरून येतो....
लिहितानाही त्रास खूप होतो मनाला
आठवणींचा डोंगर जिवंतपणी उभा केला....
आपल्या नंतरही आपल्या नावाचा उल्लेख व्हावा
तरुण पिढीत आपल्या विचारांचा दीप पेटावा.....
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
