आठवणींचा पाऊस
आठवणींचा पाऊस
1 min
28
आठवणींचा पाऊस
आठवणींच्या पाऊसधारा
देतात मला स्वप्न किनारा
गोंधळ होते जरा हा सारा
आठवणींचा हा खूप पसारा...
सूर्य प्रभात समयी आला
धरणीला आतुर भेटायला
मनीचे गुज वसुधाच्या
कानात आला सांगायला...
सूर्याची ती सुंदर लाली
वसुंधरेवर छान सजली
वृक्षवेली सारीच नटली
एकमेकांशी कुजबुजू लागली...
गुज गोष्टी आईशी करूया
घरी चला रे सारे भरभर
शाळेत घडले ते सांगू या
पाऊस पडतोय सर सर...
वसुधा नाईक,पुणे
