सुखाची वाट
सुखाची वाट
1 min
15
*सुखाची वाट*
स्व सुखाची वाट शोधताना
मनाला विचारून चालावे
इतरांचे बोलणे मनी न घ्यावे
स्वतःच्या प्रकाशात उजळावे...
लहान सहान क्षणांत लपलेलं
खरं सुख ओळखायचे
हसण्यात, प्रेमात, आपुलकीत
जीवन आपणच सुंदर बनवायचे..
अडथळे येतील या जीवनात
वाट अवघड असते खरं पक्की
धैर्याने पाऊल टाकायचे पुढे
सुख भेटेल वाटेवर नक्की....
सुखाची वाट खूप दूर नसते
ती मनातच वसलेली असते
ज्याने स्वतःला जिंकलं आहे
त्यालाच खऱ्या सुखाची वाट भेट मिळते..
.
वसुधा 🖋️❤️
