नाती
नाती
*नात्यांची शाळा*
नात्यांची शाळा जीवनभर चालत राहते
प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ सारे शिकायला मिळते…
कधी रुसवे-फुगवे, कधी हसरे क्षण असती ठेवा
या शाळेत प्रत्येक अनुभव अनमोल आहे मेवा....
समजून घेणं आणि समजून सांगणं
हीच इथली खरी शिकवण हे पण जाणणं...
विश्वासाचा धडा इथे हृदयात कोरला जातो
आदर आणि माया यातून नातं फुलवतो...
चुका होतात, पण नाते माफ करायला शिकवते
मनातल्या भावना व्यक्त करून मोकळे होते...
नात्यांची शाळा कधी संपतच नाही
प्रत्येक क्षण नवा धडा देत राहतेच काही…
हातात हात घेऊन चालायचं असतं
एकमेकांसाठी जीवन जगताना भांडायचं नसतं..
नाती असतात कधीतरी गोत्यात आणणारी
परत एकमेकांची समजूतही घालणारी....
याच शाळेत प्रेमाचं खरं रूप उमजतं
आणि आयुष्य सुंदर, वालयांकित होत जातं...
वसू 🖋️
