STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

क्रांतिसूर्य

क्रांतिसूर्य

1 min
11

*क्रांतिसूर्य*
 क्रांतीसूर्य हा आहे तेजस्वी
 ज्ञान अंधाराला दूर करणारा
 शोषितांच्या सामान हक्कासाठी
 आवाज सत्याचा उठवणारा...

 शिक्षणाची ज्योत पेटवली
 ज्ञानाचा दीप उजळवला
सावित्रीमाईच्या मदतीने
 स्त्री शिक्षणाचा आरंभ केला….

 बंधने तोडली अन्यायाची
 समानतेचा मूलमंत्र दिला
मानवतेच्या या वाटेवर
 स्वातंत्र्याचा दीप लावला…

 दोघांनी शिक्षण ध्यास घेतला
 ज्ञानदानाची गाथा रचली
 अज्ञानाच्या काळोखातून,
 नवप्रभात उजळून टाकली…

 कष्टकऱ्यांचा तारणहार
 समाजाचा खरा दीपस्तंभ
 क्रांतिसूर्य फुले हे समाजाचे
 खरेच होते आधारस्तंभ....

 *वसुधा वैभव नाईक, पुणे* *


साहित्याला गुण द्या
लॉग इन