STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

हनुमान

हनुमान

1 min
10

*दि. २ एप्रिल २०२६*
 *विषय- रामदूत हनुमान - निस्सीम भक्तीचा आदर्श* *शीर्षक- रामभक्त हनुमान*
 जय श्रीराम, जय हनुमान
 मारुतीराया भक्तीची जिवंत मूर्ती
रामनामाचा गजर ऐकता देवा
 शक्ती,भक्ती आणि अपार तुझी कीर्ती...

 पर्वत उचलुन तू धाव घेतली
रामभक्त तू सीतामाईच्या कामी आलास
 भक्ती, धैर्य, सेवा शिकविलीस देवा
 प्रभू रामांच्या सेवेत लीन झालास....

 संकटनिवारण करता तू
जगाचा दु:ख दूर करी तूभक्तांचे देवा
 अडचणी दूर लोटतो सर्वांच्या हाच
अनमोल आहे तुझा ठेवा.....

.. हनुमान जयंतीचा आज पवित्र दिवस
 मनात असू दे श्रद्धा आणि भक्ती
 सद्गुणांची अंगी वाढ होऊ दे हनुमाना
 तुझ्या आराधनेची नाही केली कोणी सक्ती...

 नामस्मरण करा नित्य शनिवारी
 मारुती स्तोत्रात प्रचंड ताकद आहे
 नामस्मरणाची ही अनोखी ताकद
 भक्ता तू खरेच अजमावून पाहे..

 *वसुधा वैभव नाईक, पुणे*
 *मो. नं. 9823582116*


साहित्याला गुण द्या
लॉग इन