STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

जीवन कोरा कागद, आनंद शाई

जीवन कोरा कागद, आनंद शाई

1 min
14

*जीवन… कोरा कागद, आनंद शाई*
 जीवन हा कोरा कागद, स्वप्नांची वाट बघत असतो आनंदाच्या शाईने प्रत्येक क्षण रंगवतो…

 कधी अक्षरं हसरी असतात तर कधी ओलावलेली असतात
 दुःखाच्या क्षणातूनही सुखाचे क्षण फुलतात...

 कधी जीवन रेषा विस्कटलेल्या असतात
 कधी मनाच्या रंगपेटीतून चित्र नवी रंगतात...

 चुका जरी झाल्या जीवनी तरी याच चुका शिकवतात त्याच अनुभवांनी जीवनतारा छेडतात...

 लिहित राहा बिनधास्त नका धरू मनात भीती
कोरा कागदच एक दिवस बनेल सुंदर जीवन प्रीती….

 आनंदाची शाई संपली तरी आशा सोबत ठेवा कारण प्रत्येक नव्या पानावर आनंद देईल सुखाचा मेवा...

 वसुधा नाईक, पुणे... गुडमॉर्निंग सर्वांना... ❤️❤️🍫🍫🌹🌹


साहित्याला गुण द्या
लॉग इन