वारा
वारा
1 min
3
*वाऱ्याचे गाणे*
गावा माझे छान
नाही कुठे घाण...
हिरवीगार झाडी
भोवताली शेतीवाडी..
विविध आकार वृक्ष पाने
सळसळते वाऱ्याचे गाणे..
गार गार थंड वारा
पावसाच्या पडती धारा...
खिलारी बैलांची जोडी
मामाची घुंगूर गाडी...
झुळझुळ नदीचे पाणी
पाखरे गातात गाणी...
बागेत सुंदर फुले
जशी खेळती मुले...
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
