तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी..
तुझ्या आठवणी माझ्या मनात
घर करतात मनाच्या एका कप्प्यात
तरीही त्या आठवणी नकळत
माझ्या मनाला खूप बोचतात....
तुझ्याच नावाने मग सारीकडे
माझ्या अंतरात फेर धरतात
तुझ्याच विश्वात मग मला
मला खोलवर घेऊन जातात....
काही सुखाचे क्षण, दुःखाचे क्षण
एकांतातील काही गोष्टी आठवतात
तुझा तो रांगडा स्पर्श आठवतो
मनात तुझ्या सहवासाचा पिंगा घालतात....
मंद धुंद वाऱ्याची झुळूक येते
तशी मी हलकेच भानावर येते
अरे हे काय? असे स्वतःशी म्हणत
मी जागेपणी स्वप्नात हरवून जाते...
वसुधा वैभव नाईक
मो. नं. 9823582116
शुभ प्रभात सर्व मित्र-मैत्रिणींना ❤️🌹🙏
