बालपण हरवले
बालपण हरवले
असे वाटते कशाला आले हे तरुण पण
द्या मला आणून हे कोणीतरी ते हसरे बालपण...
फार आठवतय तो बालपणीचा काळ होता सुखाचा
आता नुसत्या विवंचना अन काळ बराचसा दुःखाचा...
आठवतो तो घासच चिऊचा आईने भरवलेला
आठवतो तो वाडा चिरेबंदी असलेला..
आठवते ते बालपण शाळेच्या घाई गर्दीत गेलेले
गणिताची सर्व सूत्रे निमुटपणे शिकलेले...
अवघड गेले जरा मराठीतले व्याकरण
आपल्याच मित्रानी अजाणते खेळलेले राजकारण...
लोक पावले ते हसरे माझे बालपण
कशाला आलाय बरं हे तरुणपण..
बालपणातील गंमत जंमत होती ही निराळी
दप्तर टाकुनी खांद्यावरती जावे लागेल सकाळी..
मित्रांचा घोळका जमायचा करायची पोरं कमाल
चालू तासांमध्ये उडवायची विमाने होती धमाल...
असे वाटते कशाला आले हे तरुण पण
द्या मला काढणे कुणीतरी हसर बालपण...
वसुधा वैभव नाईक
मो. नं. 9823582116
