लक्ष्मीपूजन 🌹
लक्ष्मीपूजन 🌹
लक्ष्मी पूजन
झगमगाट अंगणी
दिव्यांचा
दारोदारी सजली रांगोळी
आनंदाचा निवास सोबतीला
आली दिवाळी,आली दिवाळी..
दिवाळी आहे खूपच खास
त्यात सदनी लक्ष्मीनिवास
फराळाचा सुगंध सुटलाय
सोबत दीपमालेची आरास...
लक्ष्मी माता घेऊन आली
सर्वांच्या सदनी सुखाची झालर
लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा
आपण सर्व करूया आदर...
माता लक्ष्मी आली सोनपावलांनी
उधळण होते बर सुखाची
धन- धान्य पशुवृद्धीच्या राशी
बरसात होऊ दे आनंदाची....
महालक्ष्मीचे करूया पूजन
मांगल्य दीप पेटवूया अंगणी
उत्तम आरोग्याची बरसातहोऊ दे
भरभराट येवो सर्वांच्या जीवनी..
आजच्या या पवित्र मंगलदिनी
समाधानाचे दीप उजळु दे
माणुसकीचे वारे वाहू दे
सर्वांच्या घरी सुख- समाधान नांदू दे..
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116
