STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

रंगमंच वसुधाच्या जीवनाचा

रंगमंच वसुधाच्या जीवनाचा

1 min
18

*रंगमंच वसुधाच्या जीवनाचा*
 रंगमंच हा वसुधाच्या जीवनाचा
भूमिका अनेक तिच्या वाट्याला
 कधी ती आई, कधी कन्या, कधी स्वतःशीच लढणारी रणरागिणी पण प्रेरणा समाजाला....

कधी हास्याच्या पडद्यामागे
मनात दुःख तिचं दडलेलं असतं
 प्रकाशझोतात दिसतं जे काही,
 तेच सगळंच मात्र खरं नसतं…

 कधी टाळ्यांचा कडकडाट असतो
 असतो कधी शांततेचा गूढ अंधार
 प्रत्येक प्रसंगात ती ठाम उभी असते
 धैर्याने करते या जीवनाचा स्वीकार…

 नात्यांच्या या आभासी रंगमंचावर
 वसुधा प्रत्येक भूमिका छान निभावते
 स्वप्नांच्या धाग्यांनी ती विणत जाते
 तिच्या अस्तित्वाची अनोखी अदा जगत असते..

 कुटुंब, समाज याला प्रेरक कथा लिहिते
 सर्वांकडून कौतुकाचे शब्द पदरी घेते
 सुखादुःखाच्या झोपळ्यावर कायम झुलते
 संकटावर कायम मात करत राहते...

 संकट पडदा जरी कायम साथीला
 जीवन रंगमंच काही संपत नाही
 वसुधा पुन्हा उभी राहते नव्याने
 कारण तिच्यातली जिद्द कधी मरत नाही…

 घरातले आम्ही सर्व एकच असतो
 आई, बायकोचे कौतुक होते घरातून
 माझे मानस पुत्र योगेश, गौरव, आणि माझी टीम असते कायम माझ्या साथीला समाजातून..

. वसुधा वैभव नाईक.पुणे ✍️


साहित्याला गुण द्या
लॉग इन