STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Fantasy Children

4  

Shubhangi M borse(pingle)✍️

Fantasy Children

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
267

काळे काळे मेघ आले

आले भरून भरून

कसे एकाएकि दाटले

धरा मोत्यासम बरसून


कडाडली वीज नभी

ओलेचिंब झाले रान 

सुखावली वसुंधरा 

पदरी वरूनाचे दान


थेंब थेंब हे खेळती

काळ्या आईच्या गर्भात

ओल्या मातीचा सुंगंध

दरवळला नभात


माय अमृतात न्हाली

मोती सांडले कणात

अंकुरले रानवन

जीव फुलला मातीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy