STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Inspirational

रानभाज्या रानमेवा

रानभाज्या रानमेवा

1 min
7

लाभले हेच आम्हास 

निसर्गाचे वरदान

फळे फुले कंदमुळे 

हिरवळ रानमाळ 

गोड रसाळ मधुर फळे

आरोग्यास वरदान 


रानभाज्या रानमेवा

साऱ्यात आहे महान

कारली तोडली कटरली

आयुर्वेदात महान 

बहुगुणी पालेभाज्या

पोषक शरीरास छान 


सर्दी कफ खोकल्यास

उपयुक्त अडुळसा फार.  

चवीला आहे आंबट तुरट 

आघाडा आंबाडी भोकर 

तांबे कॅलशियम युक्त

पौष्टिक रानभाज्या मस्त


हिरडा आवळा बेहडा

पाचनक्रियेस भारी

तुळस कोरफोड कडुलिंब

यांची किमयाच न्यारी

हवा शुद्ध ठेवुनी 

रोगावर करते स्वारी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract