सण दिवाळीचा हर्ष उल्हासाचा
सण दिवाळीचा हर्ष उल्हासाचा
सण दिवाळीचा देव दिवाळीचा
सण वसुबारसेचा गोधन पुजनाचा
वात्सल्य उदारता अंगी बाळगण्याचा
सण नाविण्याचा सण उल्हासाचा
सण दिवाळीचा देव दिवाळीचा
धन्वंतरी पूजनाचा , धनवर्षावाचा
आरोग्य संवर्धनाचा ,निरामय जीवनाचा
सण आनंदाचा ,हर्ष उत्साहाचा
सण दिवाळीचा सण सर्वांचा
सण नरक चतुर्दशीचा सत्कर्म करण्याचा
अन्यायावर सत्याची विजय मिळवण्याचा
सण दिवाळीचा छोटी दिपावलीचा
सण दिवाळीचा लक्ष्मी पुजनाचा
सुखसमृद्धी मनोकामनेचा
सण प्रसन्नतेचा सौंदर्यवैभतेचा
घराघरातील लक्ष्मीचा स्त्री सम्मानाचा
सण दिवाळीचा सण पाडव्याचा
बलीप्रतीपदेचा , बळिराजाच्या आठवणींचा
सण दानधर्माचा, सण आनंदाचा
सण नववषर्षरंभ दिनाचा, नुतन वर्षांचा
सण दिवाळीचा सण भाऊबीजेचा
अतुट नात्याचा , प्रेम विश्वासाचा
सण बहिण भावाचा ,ओवाळिचा
बंधु भावनेचा पेम ममतेचा
सण दिवाळीचा सण सर्वांचा
लहान मोठ्यांचा गरिबी श्रीमंताचा
झगमग फटाक्याचा दिव्यांची रोषणाईचा
सण मिठाईचा गोड गोड फराळाचा
सण आनंदाचा हर्ष उत्साहाचा
नवीन खरेदिचा नाविन्याचा
सण खर्चाचा दिवाळं निघण्याचा
सण दिवाळीचा सण देव दिपावलीचा