पाऊस
पाऊस
कसं एकाएकी आज
मेघ आभाळी दाटलं
धरत्रीच्या भेटीसाठी
आज आभाळ फाटलं..!!१!!
पावसाच्या सरीतुन
मोती टपोरे पडले
ओल्या मातीचा सुगंध
रोमा रोमात भिनले....!!२!!
या बेधुंद पावसानं
भूक तहाण हरवली ।
नदी नाले सरोवर
आनंद विभोर झाली.....!!३!!
रानोवनी शेतामधी
जणू नक्षत्र सांडले
गवताच्या पात्यावर
थेंब फुलात हासले.!!४!!
सुखावला बळीराजा
सुखावली वसुंधरा
सरसर सरीतून
पडे अमृताच्या धारा...!!५!!