आली दिवाळी
आली दिवाळी
आली आली हि दिवाळी
सोन पावलांनी आली
सुख समृध्दी घेवूनी
दिप ज्योती उजळली
आली आली हि दिवाळी
झेंडू फुलाचे तोरणं
सुवासिक सुगंधाने
घरोघरी उधळण
आली आली हि दिवाळी
स्वर्ग सुखाची आरास
नांदो अखंड लक्ष्मी
वाढो धन धान्याच्या रास
आली आली हि दिवाळी
दारी सजली रांगोळी
नवचैतन्य हर्षाची
बहिण भावाला ओवाळी
आली आली हि दिवाळी
आज आनंदाचा क्षण
नाती गोती जपूनिया
करा दिपावली सण
