आई
आई
आई घे मले पदरात
आलो तुझ्या उदरात
कसा राहु सोडुन तुले
सांग मले या जगात ll१ll
जरा आयकून घ्या तुमी
मायेच्या प्रेमाची गोट
सोता राहुन उपाशी
भरे लेकराच पोट ll२ll
सुखदु:खात लेकराच्या
रात रातं ती जागते
पोरं लोटे जरी दुर तरी
त्यांच सुखच मागते ll३ll
ती करे समुद्राले गोड
तिच्या नावाचा गोडवा
तिनं शिजवलं अन्न
जसा उसाचा खोडवा ll४ll
जग म्हणते अमृत
तिच्या दुधाच्या चवीले
तिले पाहुन सुचते
नव्या कल्पना कवीले ll५ll
माय माउलीच्या कथा
किती जगात मुरल्या
माय संपली तरीबी
तिच्या आठोनी उरल्या ll६ll