STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

दागीना

दागीना

1 min
2.8K


प्रितीचा तव दागीना

मज हवासा वाटतो

घालतो घाट समोर 

ह्दय तुझेच मागतो


बाहू तू फैलावुनी

मज घ्यावे जरा कवेत

पोर्णिमेची रात्र ती

करावी साजरी तुझ्यासवेत

यास मी तुझी साथ मागतो

घालतो घाट समोर..

ह्दय तुझेच मागतो



अनमोल तुझी ती साथ

सरत्या रात्रीला बहार

चंद्रही रोजच मोजतो

घटकेचा तो प्रहर

त्या प्रहरा तिल तुझे क्षण मागतो

घालतो घाट समोर

साथ तुझीच मागतो...


ना राहनार यौवन

ना राहनार अशिच ती प्रित

येनार परतून परतून

दुसरे ,तिसरे सुख मित

त्या सुखाच्या क्षणासाठी

तुझीच संगती मागतो

घालतो घाट समोर

तुझीच साथ मागतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance