STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

तू नसतोस जवळी तेव्हा

तू नसतोस जवळी तेव्हा

1 min
14.3K



तू नसतोस जवळी तेव्हा

मन सैरभैर होते...

न्हाते डोळे पावसात..

मन ऊद्धीग्न रे होते...

तू नसतोस जवळी तेव्हा मन सैरभैर होते.

रात्र जवळ सुखाची

संध्या राणी रातीची

उशीत खुपसुनी डोके

स्वप्न उरात बागळते..

तू नसतोस जवळी तेव्हा

मन सैरभैर होते.

स्मित तुझे ते मला

वेडावून रे जाते

हळूच स्पर्श तुझा तो

मनात भाव भरते..

तू नसतो जवळी तेव्हा...

मन सैरभैर होते.

तुझे माझे हे अनुबंध

दुरावा तो मिटवते

मग हलकेच तुझ्या रे 

कवेत विसावा घेते

तू नसतोस जवळी तेव्हा...

मन सैरभैर होते




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance