तू हरवला आहेस
तू हरवला आहेस
मी तुझीच आहे
अस तू नेहमी म्हणतोस..
मग का?समाज समाज.करतोस..
तू जाणतोय ना मला..मग
का? ईतका दुर राहतोस...
आठवतेय ना तुला ती घट्ट मिठी
माझ्या ओठाला घेतलेस होते तू ओठी...
धुंद झालोय ना आपण त्या भेटीत..
स्वप्न रंगवलित ना डोळ्याच्या समुद्र काठी..
मी तुझ्या आठवात राहावी,
तुझ्या श्वासात दरवळत राहावी....
असा म्हणतोस,,, अन् शब्द सामर्थ्यात तू मला गुतंवू नको...
जगण्याचं वेड मज लावू नको
तू म्हणतोस असही ,मी एकटाच आहे
मग तुला जगण्याचे हितगुज कसे कळले आहे.
तू समजतच नाही ,तुझ्या जीवनाशी जोडलय मला तू...
पण स्वत:च्या अंहपणातच जगतोय तू..
तू निडर आणि आहेस ,संयमी अंतःकरणाचा..
का?मग ध्यास तो तुला मरण्याचा..
अर्ध नग्न स्वप्ने ठेवने बरे नाही...
ज्यांना ह्दयात बसवले त्यांना दुर करन
े बरे नाही...
मी हरवावी का?तिसर्यांदा खेळ हा रंगवून...
जीवन भुलले होते तुला थोडं जवळ बघून..
सावरले आता ....कळलय क्षणीकच असते भावना..
अस्ञ होते शब्द अन् तोडक्या
रक्तबंबाळ ह्दयात घाव ना?
समजशिल ज्या क्षणी ..काळ तो सरकत गेला असेल...
अशोका ने केलाय रक्तपात,रक्ताच्याचं नात्याच्या कत्तली....
पण शेवटी बुद्धालाच गेलाय शरण...
तू ही तसाच हो ना?...शांती मार्गावर प्रवन...
बघ जीवन सुंदर आहे ,तुलाही माहीत आहे..
मग कुणासाठी असा लढणार...
सुळी चढणार...
एकच व्यक्ती कधीकधी जीवनात बहार आणत असतो...
भंगलेले स्वपनां मधे रंग तो भरत असतो..
तू हरवला आहेस ,फक्त तुझ्याच मनातून..
विराजतो तू माझ्यात आतून...
पण!तुझ मृगजळ जगने तुला सोडतं नाही...
तुझी वाट कुणी तरी बघतय हेच तू जाणत नाही...