STORYMIRROR

bhavana bhalerao

Tragedy

4  

bhavana bhalerao

Tragedy

मी काय बाई घरातच असते.....

मी काय बाई घरातच असते.....

1 min
319

मी काय बाई घरातच असते 

तसे मला काहीच काम नसते...


सकाळचा चहा फक्त दोनदा होतो 

मग कुठे नवरोबा उठुन बसतो 

पोरांना पास्ता,सासरयांना उपीठ 

सासुबाईंच्या पानात कमीच होते मीठ

मी काय बाई घरातच असते 

तसे मला काहीच काम नसते..


भाजीपाला, दळणबिळण, झाङलोट 

पोरांचा अभ्यास, सङारांगोळी,

सासरयांना पानात गरम हवी पोळी 

किती ती झाङलोट, पुसपास, 

कोपरयात परत दिसलाच ग कोळी

सणवार येऊ दे ,नणंद पङते भोळी 

सासरी खुप काम, देते साङीचोळी 

निवङसावङ करुन ङबे घासायचे 

कंबर मोङ करुन पुन्हा ते भरायचे 

मी काय बाई घरातच असते

तसे मला काहीच काम नसते...


उदया माझा उपवास, परवा एकादशी 

अग बाई, विसरले की ह्यांच्या येणार मावशी

त्यांना म्हणे सगळं व्यवस्थित लागत 

माझ काय सांगू कसंही भागतं 

मी काय बाई घरातच असते

तसे मला काहीच काम नसते...


संपतच नाही हिच काम 

ती काय घेईल देवाचं नाव 

सासुबाईंच्या चेहरयावर हेच भाव 

खर सांगा, भरतात का शब्दाचे घाव??

किती येते आठवण माहेरची, माझ गाव !

मनात सतत येते आईकङे घ्यावी धाव 

मी काय बाई घरातच असते 

तसे मला काहीच काम नसते...


सर्दी खोकला झाला तरी कंबर कसते 

लगेच कशाला ङाॅक्टर, लाङ म्हणे नुसते 

असाच विचार करून घरातच बसते 

नोकरीवाली मेत्रिण दिसली की

स्वतःशीच हसते ..

मी काय बाई ......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy