चंद्र
चंद्र
1 min
275
तळ्यात उतरत चंद्र बोललाच माझ्याशी
तुझ्या सारखं पाय सोङुन बसायचय तळाशी
वर वर आकाशात आताशा करमत नाही मला
जशी नजर लागली की सुचत नाही तुला
कोजागिरीला येतोच तुझी भेट घ्यायला
थोङ दुध केशर घालुन मलाही ठेव प्यायला
गप्पा गोष्टी गाणी बर वाटतं ऐकायला
तुझ्यातही काही कमी नाही हे जाणुन घ्यायला
आयुष्य सुंदर आहे हे समजून घेताना
मी गेलो की अमावस्या येईल तुझी दृष्ट काढायला...
