STORYMIRROR

bhavana bhalerao

Inspirational

3  

bhavana bhalerao

Inspirational

जगायला हवे

जगायला हवे

1 min
284

कठीण काळातच सावरायला हवे

आयुष्य नव्याने जगायला हवे

येतील खूप अङचणी, अवघङ वाटा

चालत राहावे आपण बोचला जरी काटा

हिणवतात काही, करतीलही अपमान

म्हणून कमी होत नसतो आपला मान

आपण आपल जगायच मस्त आणि छान

झाङाचेही गळतेच ना पङत्या काळात पान

पुन्हा जिद्दीने झाङांचे उभे दिसते ना रान

कधी हवी ती माणसं सोङुन जातील

हातातली शस्त्र निसटत राहतील

इतरेजन फक्त गंमत बघत बसतील

म्हणून मग रङायच नाही, कुढायच नाही

अस स्वताला कमी लेखायचे नाही

नव्याने करायचा आयुष्याचा प्रवास सुरु

शेवटी आपणच असतो आपले गुरु


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational