STORYMIRROR

bhavana bhalerao

Others

4  

bhavana bhalerao

Others

चुकलच जरा आमचं

चुकलच जरा आमचं

1 min
23.7K

चुकलच जरा आमच,

ऐकलं नाही तुमचं

झाङपान पशुपक्षी 

सगळे आहेत साक्षी 

मनमानी करत गेलो 

दिसेल ते झाङ 

वाट्टेल तो ङोंगर 

आम्ही कापत गेलो 

उंच उंच घरांची 

हाव होती आमची 

जराही तमा न बाळगता 

कत्तल केली तुमची 

नदी काय ,झरा काय 

वाटणी करुन 

साठवत गेलो 

सिमेंटची जंगल 

बांधत गेलो 

चुकलच जरा आमच 

ऐकलं नाही तुमचं 

आता जरा उमगतय 

मनही खरच पस्तावतय 

आता मन भानावर येतय 

आमचच आम्हाला खातय 

आता मात्र वचन देतोय 

आम्ही आमच्या हद्दीत राहतोय 

एकमेकांना स्पेस देतोय 

एवढीच विनंती आता करतोय 

निसर्गातील सगळया अनुभुतींना 

एवढी चुक आमची पदरात घ्या 

निसर्गराजा आशीर्वाद दया


Rate this content
Log in