पंगत
पंगत
1 min
11.5K
तेल तापले, मोहरी उडली
रागाची मग तिरपीट झाली
हिंगाने मग ताबा घेतला
वासानेच मग जीव चेतला
हळूच हळदीचा रंग पिवळा
संसार जपतो कौतुक सोहळा
लाल रंगाची मजाच न्यारी
आयुष्याची गंमत भारी
मसाल्याचा रुबाब वेगळा
येता जाता धाकच सगळा
जेवणाचा बेत आखला
मी ही मग मजेत चाखला
पानसुपारी मुखवासाने
पंगत भरली समाधानाने
