भिंती
भिंती
1 min
11.6K
माझ्याच घराच्या भिंती
निरखून पाहिल्या आज मी
एक होती अबोल जराशी
समोर होती रागीट कशी
खिडकीजवळची खटयाळ
चित्र रंगवलेली ती नाठाळ
सुंदर सात्विक देवघराची
हसरी ती स्वयंपाकघरात
आतली ती लाजरी आहे
शृंगार तिथे मांङला आहे
घराबाहेरची हसरी दिसते
मनाचे तिथून उघङतात रस्ते.
