STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

मा.गोपिनाथजी मुंडे-पोवाडा

मा.गोपिनाथजी मुंडे-पोवाडा

1 min
28.8K


सलाम गोपिनाथ मुंडे साहेबाला।लोकनेत्याला।आदर्श विचाराला।केंद्रीय मंत्री साहेबाला।

जन्म झाला ग्रामीण भागात।शेतकरी कुटुंबात।बीड जिल्ह्यात।महाराष्ट्राच्या भूमीत।भारत देशात।जी जी जी


धडाडीचा नेता महाराष्ट्राला।महाराष्ट्र विकासाला।देश विकासाला।गरीबांची जाण नेत्याला ।गरीबांचा वाली महाराष्ट्राला।जीवन बहुजन कार्याला।शेतकरी, कष्टकरी वर्गाला।ग्रामीण भागाच्या विकासाला ।जी जी जी


कार्य चाले जन माणसात।गरीबांची तहान, भूक जाणत।

खेड्यापाडयाच्या घराघरात। मदतीचा करुनी हात।

नेता वसला जनतेच्या हृदयात।लोकांच्या अंतकाळजात।

लोकांच्या मनामनातत।जी जी जी


संघर्ष त्यांच्या रक्तात।त्यांच्या कार्यात। त्यांच्या जीवनात।

त्यांच्या अंगात।आयुष्य लाभले थोडे नेत्याला।उजाळा

त्यांच्या आठवणीला।त्यांच्या पवित्र कार्याला।महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राला।जी जी जी


वाघासारखे ते निडर।नेतृत्व होते खंबीर।शुद्ध वाणीचे त्यांचे विचार।आई वडिलांचे आदर्श संस्कार।विचारांचे मोठे भांडार।आनंदी, समाधानी ,शूर ।निर्णय क्षमतेचा असे विचार ।जी जी जी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational