STORYMIRROR

Prachi Adlok

Inspirational

4.0  

Prachi Adlok

Inspirational

बनायचंय मला

बनायचंय मला

1 min
28.6K


जेथे जेथे तिमीर , काळाकुट्ट अंधार

तेथे लख्ख झगमगणारा दिवा बनायचंय मला

जेथे जेथे अज्ञान, ज्ञानाचा अभाव

तेथे ज्ञान देणारा कल्पवृक्ष बनायचंय मला

जेथे जेथे वेदना, कोसळलंय आभाळ

तेथे अश्रूंना गिळणारा खांदा बनायचंय मला

जेथे मानव ग्रासला भुकेने अथवा पशू

तेथे भाकरया चारणारी संस्कृती बनायचंय मला

जेथे अजूनही पोहचू शकलेच नाही कुणी

तेथे ओथंबलेला मदतीचा हात बनायचंय मला

जेथे ओठांवर तरळलेच नाही हास्य... गेले पंधरवडे

तेथे लोटपोट हसण्याचं कारण बनायचंय मला

मी बनू शकते केवळ माध्यम , दरम्यानचा दुवा

परमेश्वराने सेवेसाठी जीवन दिले त्याची ''लेक'' बनायचंय मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational