STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

5.0  

Manisha Potdar

Inspirational

विठ्ठल माझा

विठ्ठल माझा

1 min
28.3K


विठ्ठल माझा आहे लाडका

नाही करत हट्ट कसला

विठ्ठल माझा नाही रडका

विठ्ठल माझा आहे लाडका


नाही मागत सोनं चांदी

नाही मागत हिरे-मोती

असुदे भक्त कितीही कडका

देईन त्याला समाधानाचा मडका

विठ्ठल माझा आहे लाडका


नकोत त्याला होम-हवन

नकोतं त्याला मिष्टान्न भोजनं

नकोतं त्याला भरजरी कपडा

नको तं त्याला पैसा अडका

विठ्ठल माझा आहे लाडका


विठ्ठल नामाचा रे भुकेला

विठ्ठल भोळ्या भक्तीचा भुकेला

नकोत त्याला बळीचा प्राणं

नकोतं मला मी पणाचा झटका

विठ्ठल माझा आहे लाडका


दे मजला कष्टाची भाकर

होईन तुझा च मी चाकर

अवघ्या सृष्टीचा तूच चालकं

विठ्ठला तुझा मी लाडका

विठ्ठल माझा आहे लाडका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational