स्वप्न परी
स्वप्न परी
1 min
349
जिला असतात सुंदर पर
तिला म्हणतात परी
आकाशातून उडत उडत
येशील कागं माझ्या घरी ?
रूप तिचे सुंदर स्वप्नी
मनातं आहे खरोखरी
या काळातही स्वप्नी
ती आहे नक्कीच कुठेतरी
जादू तिची असते जगावरी
गोष्टी तिच्या आहे घरोघरी
लहान, मोठे सारी होता वेडी
अदृश्य रुपात करते जादूगीरी
जिचे पाण्यातंच असते घर
तिला म्हणतात जलपरी
ती जादूची कांडी फिरवते
आपल्या साऱ्यांच्या घरोघरी
