STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

0.2  

Prashant Shinde

Inspirational

मुक्त....!!

मुक्त....!!

1 min
28.5K


पंख फुटले मला

मी मुक्त झाले

मोकळा श्वास

मज घेता आले....!


बंधनात मी

आजवर होते

ओझे डोईवरी

उगा वागवीत होते....!


समज गैर समज

मनात साठत होते

त्याचेच दडपण

मी झेलत होते....!


माझ्या शिरावरी

उपकार नाचत होते

ते नाचच मज

त्रास देत होते...!


आईन्यात पहाता

मला मी हरकून गेले

बंध मुक्त होता

थोडी सुखावून गेले....!


धागा विश्वासाचा

घट्ट बांधलाच आहे

त्या गाठीस मी

माझ्या उरात ठेवले आहे ...!


मनोभाव हे मज

सदा सांगत हेच असतो

लपवण्यात काहीही

मार्ग चुकीचाच दिसतो...!


म्हणून मी सदा

खुल्या मनाने अन

खुल्या दिलानेच

आनंदी जीवन सदा जगते....!


स्वातंत्र्य म्हणजे काही

स्वैराचार नक्कीच नाही

तारेवरची कसरत जीवन हे

तोल राखूनीच मी जगते....!


आशीर्वाद मायबापाचा

असता न्यून काहीच उरत नाही

जीवनात या अशक्य असे

आता काहीच राहिले नाही...!


मी माझी मुक्त अशी

विहार गगनी भरारी घेणार आहे

यशाची प्रत्येक शिखरे

मी पादाक्रांत करणार आहे.....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational