STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

शिक्षक दिन पोवाडा.

शिक्षक दिन पोवाडा.

1 min
41.6K



आधी वंदन शिक्षक दिन।गौरव दिन।देशाची शान।सावित्राबाई फुलेंचे योगदान।समाज कंटकानी पेटविले रान।जोतिरावाने दिले झुगारून।स्त्रियांना मिळाला सन्मान ।जी जी जी

स्त्री पुरुष दोघे समान।शिक्षणाने जागृत करुन।शिक्षणाचे मोठे दालन।जातीभेद अस्पृश्य निवारण।सर्वांस शिक्षण समान।समाजकार्याला वाहिले जीवन। मुलींच्या शिक्षणाचा हक्क देऊन।जी जी जी

तांत्रिक नवीन शिक्षण।कृतीतून आले शिक्षण।विद्यार्थ्यांचे व्हावे समाधान।समाजाने राखावा मान।स्वच्छतेला, शिस्तीला असावे स्थान।पालकांचे मिळावे योगदान।

वृक्षरोपनाला मिळावे प्रोत्साहन।जी जी जी

शिक्षणाची असावी जान।वास्तवाचे ठेवावे भान।काळानुरूप असावे शिक्षण।गोरगरीबास मिळावे शिक्षण।

व्यवसायी शिक्षणास प्रोहत्सान।जगण्याची कला शिक्षणातून।वाढवावी जगण्याची शान।बेरोजगारी जाईल पळून।जी जी जी

मूल्य शिक्षणाचे करुन जतन।सयंम, शिस्त, आचरण।घडवावा नागरिक आदर्श सुजान।गुरु, शिष्य मिळावा मान।गुणीजनांचा व्हावा सन्मान।समाजाचे असावे भान।

व्हावा विकास सर्वांगीण। जी जी जी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational