डॉ.अब्दुल कलाम...
डॉ.अब्दुल कलाम...


डॉक्टर मानव धर्माचे
अवलिया हे ज्ञानाचे
उरली सुरली ऊर्जा सारी
लगावली देशासाठी
पार करण्या ध्येय मायभूमीचे
किती आले किती गेले
रमला हा आपल्या देशात
जैविकतेचा अभ्यासू
नुरे प्रत्येक क्षेत्रात
लाजवेल अशी ज्ञान प्रतिभा
बरहुकूम यांच्या हातात
दिव्यत्वाची इथे प्रच
िती
नकारत्मकता दूर सारून देती
असण्या नसण्याच्या पलीकडे
बस्तान आपले बसविती
दूरदृष्टीचे वरदान लाभता
लय जीवनाची सहज साधती
कर्तव्याची जाण मनी राखूनी
लाज देशाची राखती विश्वात
मला वाटते महान कलाम
पुन्हा जन्मणे शक्य नाही या जगतात
पुण्यतिथीचे औचित्य साधुनी
पुण्य पदरी बांधू या जन्मात...!!
कलमांच्या चरणी नम्र अभिवादन...!!!