विठूदर्शनाची आस
विठूदर्शनाची आस


कटीवर हात, विटेवर उभा माझा विठू
ध्यास मनी माझ्या कसे तुला भेटू
मनी एक शंका दुखले असतील तुझे पाय
लावून देउ का रे तुला चंदनतेल, दुसरे करू तरी काय
कानाकोपर्यातुन आले वारकरी
चंद्रभागेसह दुमदुमली पंढरी
विठ्ठल नामाचा गजर तुझ्या कानी
क्षणभर बोल ना रे, ऐकू दे तुझ्या मुखातुन अमृतवाणी
बघून तुझे रुप
विसरुन जातो तहानभूक
नैवेद्यासाठी ठेवला राजगिऱ्याचे लाडू, वरीचा भात
खाऊ घालते तुला, नको काढू कटीवरचे हात
तुझ्या दर्शनासाठी वारूही धावतो
नकळत तू भक्ताला पावतो
ठेवतो डोईवर तुळस, पायात बळ देतो
बळिराजा तुझ्या नामाचा गजर करीत तुझ्याच समीप येतो