STORYMIRROR

Medha Nene

Inspirational Others

3  

Medha Nene

Inspirational Others

आला भरून पाऊस

आला भरून पाऊस

1 min
132

आला भरून पाऊस

मंद वारा गातो भूप

काळ्याभोर मेघामध्ये

श्यामसुंदराचे रूप


शामल मेघामागून

रवीकिरण फाकले

केशवाच्या माथ्यावर

मोरपिस ते सजले


रव पावसाचा वाटे

जसे बासरीचे सूर

संगीतात भिजण्यास

कान झाले गं आतूर


मधूनच रमणीय 

नृत्य करीते चपला

घननीळा करीतसे

गोपींसवे रासलीला


साथ त्यांसी द्यावया

ढग वाजवी मृदुंग

सृष्टी बनली गोपिका

भक्तीरसात रे दंग


तुज मागणे ईश्वरा

असू देत हाची वर

त्याचे करीतो स्वागत

पसरूनी दोन्ही कर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational