STORYMIRROR

Mrunal Thakurdesai

Inspirational

3  

Mrunal Thakurdesai

Inspirational

शापित सौंदर्य

शापित सौंदर्य

2 mins
148

पृथ्वीवरचा स्वर्ग मानावे भारताच्या नंदनवना.

काश्मिरचे रमणीय वैभव हा निसर्गाचा नजराणा. !!

विविधरंगी टपोरे गुलाब,लहानमोठी नानाविध फुले,

शिका-याचा तरंगता अनुभव,साथीला लिलीचे ताटवे.!!

ओक,देवदार,पाईन,फर,सफेदा,सूचिपर्णी वृक्ष,

बर्फाच्छादित शिखरांनी नटलेले विहंगम दृश्य.!!

सफरचंद,चेरी,अक्रोड,बदामाची वर्षभर मजा,

प्रत्येक ॠतूत वेगळे रूप दाखवितो निसर्ग राजा.!!

"कहावा"च्या स्वादासह व्हावी दाल सरोवराची सफर,

सुबक गालिचे,कशिद्याची पहावी सुरेख कलाकुसर.!!

खळाळत्या झेलम नदीकाठी पसरले केशराचे मळे,

सृष्टीच्या वरदानाचे गोड गुपित कोणा न कळे.!!

या देखण्या रूपाला दहशतवादाचा काळा शाप,

विधात्याच्या दातृत्वाला मानवी सीमारेषेचा ताप.!!

स्वर्गीय सौंदर्यासम प्रकृतीची मुक्त उधळण,

प्रांतवादाच्या धर्मयुध्दात निरपराध्यांचे मरण.!!

रक्ताचा सडा हाच तर सीमारेषेचा निष्ठुर भोग,

गरीबीच्या साथीला धार्मिक अशांतीचा असाध्य रोग.!!

हिमालयाच्या रम्य औदार्यात फळाफुलांचे माधुर्य,

सोबत मनुष्याचे क्रौर्य असे काश्मिरचे शापित सौंदर्य !!

मोहमयी हिमालय अजूनही शांततेच्या प्रतिक्षेत,

साक्षीदार उभा हा घेऊन "सकारात्मक उर्जेला"कवेत.!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational