"आपण शर्थ करु"
"आपण शर्थ करु"
या जगण्याचे पांग फेडण्या,आपण शर्थ करु
आपण शर्थ करु,आपण शर्थ करू !!
इवल्या इवल्या डोळ्यांनी या,
देश भक्तीची वाचू कथा
हिम्मत देऊन हातांना या,
दूर करु दुरीतांच्या व्यथा
साक्षरतेचे दाणे पेरुनी, शिकणे सार्थ करु !!
सेवक होऊन वसुंधरेचे,
ठाई ठाई लावू झाडे
धो धो रुप घेऊन वरुणाचे,
नद्या नाले भरुया ओढे
प्रदूषणाला दूर सारुनी, सृष्टी हरीत करु !!
सैनिक होऊन या देशाचे,
रक्षक होऊ दिनदुबळ्यांचे
खोडकर त्या भुंग्यांपासूनी,
रक्षण करु कोवळ्या कळ्यांचे
जुन्या प्रथा मोडुनी करू, नवीन पर्व सुरु !!
प्रगतीचे पंख घेऊनी,
उंच भरारी घेऊ चला
विज्ञानाची कास धरुनी,
भूगोलास वाचवू चला
इतिहासाचा ध्यास घेऊनी, मरु पुन्हा अवतरु !!
