STORYMIRROR

Nilesh Ujal

Others

3  

Nilesh Ujal

Others

पाहुणा श्रावण.

पाहुणा श्रावण.

1 min
14K


आला पाहुणा पाहुणा
श्रावण माझ्या गावात
प्रफुल्ल आणि देखणा
मंगल भक्ती भावात.

नटला तो मांगल्याने
देव्हाऱ्यात फुलांसह
सजला तो सौंदर्याने
घरट्यात आईसह.

रोज वाचतो ग आता
पुराण तो बाबांसंगे
खाई नैवेद्य निराळे
आवडीने आईसंगे.

त्याला नुसते आवडे
पालेभाज्यांचे आहार
कसे व्रतवैकल्यांचे
सारे सोसतात भार.

आला पाहुणा पाहुणा
श्रावण माझ्या गावात
सारे किती आनंदात
एकपणे राहतात.


Rate this content
Log in