कविता कशी असते ?
कविता कशी असते ?
कविता कशी असते ? कशी असावी ? कुणी म्हणत कविता अशी असावी
कुणी म्हणत कविता तशी असावी ,मला वाटते ती कशीही असू शकते
ज्याला जशी दिसते तशीच ती असते , ती हसते , रडते , भांडते , रुसते , गाते
काहींचा लेखी ती अस्तत्वातच नसते ,काहींच्या मते ती चराचर श्रुष्टीस पुरून उरते
मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना ती स्पर्श करते ,
त्यांच्या दुःखांना वाचा फोडते ,क्रांतीचे गीत गाते
कधी हळहळते , तर कधी जगण्यास उभारी देते ,
कोणी काहीही म्हणो कविता हि नेहमीच प्रेरणा देते
कविता असते स्वप्नाची आरास , जगण्याची आस... ,भुकेल्याचा घास ,
भविष्याची चिंता नि आयुष्याचा गुंता ती असते कधी शांतीचं प्रतिक
तर कधी क्रांतीची मशाल ती असतेच नेहमी प्रेमाचा स्वीकार नि मानवतेचा जागर
,कविता करते नेहमीच गुणांची कदर , देते मायेचा पदर ती होते कधी आनंदाचा सागर
नि गरजेचं स्वावलंबन ती असते प्रतिभेची भरारी , सौंदर्याची झळाळी ,
मायावी कुपी कधी ती बनते सृजनाचा अंकुर , तर कधी वेदेनची फुंकर ..
.कविता म्हणजे चिंतन , मनन आणि संस्कार असते स्फ्रूर्ती , आवेगातून ती लाव्हारसासारखी
आतून येते रसिक मनाला साद घालते ,वेडावते, अंगोपांगी बहरते कधी वेदना तर काही प्रेम ,
आनंद देऊन जाते ...कविता म्हणजे फक्त यमकाची भाऊगर्दी नसते तर ती आशय ,
अभिव्यक्तीची साधना असते ... उत्कट प्रतिभेतून साकारणारी ती एक कलाकृती
रसिकतेला उद्युक्त करणारी ती एक सजीव श्रुष्टी कविता म्हणजे नवोन्मेषशालिनी प्रज्ञा
, ईश्वरी ईच्छा मानवजातीप्रती अपार करुणा, भाव -भक्तीचा सुंदर मेळा कविता असते
अजरामर नि चिरस्थायी रसिकाच्या मनात ,कवित्यामुळेच माणूस घडतो ,
पर्यायाने समाज देशही सर्वार्थाने ....
