STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

1.4  

Pandit Warade

Inspirational

बीज अंकुरे

बीज अंकुरे

1 min
15.4K



आला मृगाचा पाऊस

बळीराजा खुष झाला

आळसाला झटकून

कसा लागला कामाला


सर्जा राजाला घेऊन

बळी शेतामध्ये जातो

आनंदाने बियाणांची

आधी पेरणी करतो


माय धरणीच्या पोटी

बीज सुखे विसावते

ओल मायेची लाभता

बीज डोकावू पाहते


झाली अवकृपा कशी

वेळ अवघड आली

वाट पाहत्या नयनी

गर्दी आसवांची झाली


देतो पाऊस अंतर

ओल आटत चालली

सुटे बखडीचा वारा

धरा कोरडी जाहली


बीज तरीही अंकुरे

थोडेसेही भीत नाही

झेप नभी घेऊ पाहे

येवो संकटे कितीही


नाही संकट अस्मानी

मानवाची ही निर्मिती

झाडे तोडोनिया केली

निसर्गाची त्याने क्षती




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational