गुरू...!
गुरू...!
गुरू कोणास करावे
काही कळले नाही
स्वतःचा गुरू स्वतः झाल्याने
काही अडले नाही !
वाकडे पाऊल कधी
आजवर पडले नाही
त्यामुळे जीवनात माझ्या
विशेष काही घडले नाही !
अंतरातल्या प्रकाशात
काहीच दडले नाही
आता दडवण्यासाठी
काहीच उरले नाही !
तू माझा, मी तुझा
गुरुवीण असलो जरी
मीच आता तुझ्यातच
सदा देवा वास करी ...!!!