जीवन
जीवन
एकाच्या अस्तामध्ये
दुस-याचा उदय असतो
पाठशिवणीचा खेळ हा
निसर्गाचा नियम असतो.
सुख-दुःखाच्या पारड्याचा काटा
वर खाली होतच राहतो
अंधारातून उजेडाकडे
जो तो वाटचाल करत असतो.
जीव असेपर्यंत छातीतील
हृदयाचा ठोका चालूच राहतो
कुणी कुणाच्या प्रेमासाठी
मनातच झुरत असतो.
स्वार्थासाठी प्रत्येक जण
जीवन आपले जगत राहतो
जीवन एक संघर्ष असतो
आपण सारे लढत राहतो.
अपयशातून यशाकडे
एकेक पायरी चढत जातो
मनातील स्वप्नांना
सत्यामध्ये साकारत राहतो.
जीवन एक कोडं असतं
आपण ते सोडवत राहतो
संघर्षाने झगडत राहून
जीवन आपले घडवत राहतो.
