STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

3  

Mangesh Medhi

Inspirational

घे जरा विसावा

घे जरा विसावा

1 min
15K


जाता जाता थबकुनी थोडासा

पायाशी तुझ्या वाकुनी जरासा

हलकेच गोंजारुनी नवांकुराला

शिंपुनी तव प्रेमजल-ओलावा

खत मायेचा घास भरावा


झाडे ही हसतात

बोलतात आपल्याशी


सुखावेल तोही हसेल तोही

वृक्ष होऊनी बहरेल तोही

फळ फुलांनी डवरेल असाही

पक्षी पाखरे कवेत झुलतीलही

साद सृष्टी संगीत मैफील ही


खुणावेल काही म्हणेल तोही

कधी दुमुन थकुन तुही

जीवन मार्गी खडतर याही

येशील छायेतील नदी काठी

जरा विसावा घे,घे विसावा जरा, घे जरा विसावा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational