दाखवशील काय
दाखवशील काय
दाखवशील काय सांगशील काय
गुपीत उलगडून मांडशील काय
असेल काय बाज येण्यात तुझ्या
भेटशील कशी अन नटशील काय
येशील कोठून कशास कधी
उमजावी अशी खुलशील काय
आतुर मी पाहण्या ऐकण्या तुला
दिसशील कशी म्हणशील काय
तांडव मनीचे दाह जाळणारा
लाव्हा बनुनी फुटशील काय
भग्न ह्रदयी करूण रुदन
बांध फुटूनी वाहशील काय
का..हर्षीत नजर आनंद उरात
प्रसन्न मुखी हसशील काय
वसंत मनीचा तरंग सुगंधी
बहर सृष्टी गीत गाशील काय
प्रणय गुंजन फुलां भोवती
सप्तरंगी सभोती फुलशील काय
बेधुंद स्वछंद पवन वनात
मादक गझल तुही घडशील काय
बंध रेशमी मनाचा मनाशी
मैफीली आर्त बंदीश सजशील काय
कोणत्या थाटात कुठल्या नादात
लय ताल छंद छेडशील काय